top of page

वैश्य बझार बद्दल माहिती

वैश्य समाजातील उद्योग/व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवांना/भगिनींना हक्काचं आपल व्यासपीठ असावं या संकल्पनेतून वैश्य वाणी समाज गोरेगाव यांनी  ह्या WhatsApp ग्रुप ची निर्मिती केली. आपला व्यापार हा आपल्या समाजातील समाज बांधवांना/भगिनींना मिळावा हा हेतू बऱ्याच अंशी सफल ही झालाय. परंतु समाजातील प्रतिष्ठित तसेच इतर समाज संस्था यांच्याशी चर्चा केली असता असे लक्षात आले की आपल्या समाजातील बऱ्याच लोकांना आपल्याच समाजातील व्यक्तींशी व्यापार करण्याची इच्छा आहे परंतुg त्यांची माहिती कोठेतरी एकत्र संकलित/उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी व्यापार करण्यास माहिती अभावी शक्य होत नाही.  जर अशी माहिती कायम स्वरुपी उपलब्ध झाल्यास माल विकणारा/ सेवा देणारा आणि माल खरेदी करणारा/सेवा घेणारा यांना ट्रेड करणे सोपे होईल. याच उपक्रमात पुढचे पाऊल म्हणून वैश्य वाणी समाज गोरेगाव हे त्यांच्या वेबसाईट वर *' वैश्य बाजार '* ही संकल्पना सत्यात उतरवत आहे.  यात समाजातील उद्योजकांच्या उद्योगाची माहिती / वेब पेज "VAISHYA BAZZAR" या सेक्शन खाली Services, Food & Catering, Health & Education, Grocery, Trading kinava Crafts & Home या पैकी एका  विभागात अपलोड  करून देणार आहोत . त्याकरिता समाजातील प्रत्येक उद्योजकाने आपल्या उद्योगाची जाहिरात वेबसाईट वर करणे आवश्यक आहे मग तो छोटा उद्योग असो की मोठा. आपल्याला आपला उद्योग छोटा असेल तर मोठा आणि मोठा असेल तर खुप मोठा करायचा आहे? त्याकरिता आम्ही  आमचं योगदान दिलंय आता तुम्ही ...

वेबसाईट वर नोंदणी करिता एका वर्षाला रु.१२०० - इतके नाममात्र शुल्क भरणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येकाने आपल्या माहिती/ जाहिरातीचे आर्टवर्क किंवा  वेब पेज पुढील गुगल फॉर्म मध्ये अपलोड करणे गरजेचे आहे.  चला तर मग उद्योगाच्या भरभराटीला मदत होईल अशा  नवीन पर्वाला सुरुवात करुया

 

नोंदणी प्रक्रिया

1) प्रथम ऑनलाईन पद्धतीने रू.१२०० - पुढील माहितीतील बँकेमध्ये भरणे

Account Name:- Vaishya Vani Samaj Goregaon Mumbai,

Bank:-        Bharat Co-op, Bank (Mumbai) Ltd.

Branch:-    Goregaon (East), Mumbai 400063

A/C No.:-  000310100474468

IFSC:-        BCBM0000004.

 

2) पुढील गुगल लिंक मधील माहिती भरून पाठविणे.

https://forms.gle/mV2Mvz3QfzRHcNHK6

 

3) प्रत्येकाने आपला मोबाईल नंबर व ई-मेल नोंदविणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपली माहिती घेतली जाणार नाही. कारण पुढील माहितीची आदान - प्रदान हे मेल द्वारेच होणार आहे. तुमच्या जाहिरातीची पेज लिंक मेल वर पाठविली जाईल

bottom of page